राज्यमंत्री संजय बनसुडे यांनी केला; माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांचा सत्कार

0
290

लातूर : लातूरचे माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना नुकताच ” द अमेरिकन युनिव्हर्सिटी यु एस ए” कडून पॉलिटिकल सायन्स मध्ये पी.एच.डी.(ऑनररी) आणि भारत ज्योती अवॉर्डनी सन्मान झाला आहे.

त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अनेक खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवास स्थानी माजी खासदार प्रोफेसर संसदरत्न डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार केला.

सोळाव्या लोकसभेत उच्च शिक्षित खासदार म्हणून हाई रेंज वर्ल्ड बुक रेकॉर्डस मध्ये नोंद झालेली आहे. अनेक विषयात उच्च पदव्या संपादन केलेले अभ्यासू खासदार अशी देश भरात डॉ सुनील गायकवाड यांची ओळख आहे.

या सत्कार प्रसंगी लातूर चे माजी महापौर अख्तर मिस्त्री, राष्ट्रवादीचे नेते संजय शेटे, नगरसेवक राजा मणियार, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, निलंगा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष हमीद भाई , गणराज्य संघ चे अविनाश गायकवाड, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.सुनील गायकवाड यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या बद्दल डॉ. गायकवाड यांनी मंत्री बनसोडे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here