उदगीर : भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केली आहे. उदगीर शहरातील महिला मोर्चा च्या सक्रीय कार्यकर्त्या बबिता पांढरे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा श्रीमती रुपताई पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश अप्पा कराड, आ.अभिमन्यू पवार, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्र, माजी आ. सुधाकर भालेराव, भगवान दादा पाटील तळेगावकर व भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा उत्तरा कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्यावर पक्षाचा लातूर जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्याकडील कुशल संघटन हे पक्ष वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे, आगामी काळात त्यांच्या कडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न व्हावेत अशी, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडी बद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, सोमेश्वर सोप्पा सावकार, बालाजी गवारे, मीनाक्षी ताई पाटील, उदयसिंग ठाकूर, भागवत गुरमे, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, मनोहर भंडे, दत्ता बुर्ले, रोहिदास गंभीरे, सत्यवान पांडे, उदयसिंह ठाकूर, गणेश गायकवाड, संजय पाटील मलकापूरकर, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.