लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात गरिबांना 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो डाळ मोफत देण्याची योजना सुरू केली आहे.
ही योजना नोव्हेंबरमध्ये संपणार होती. मात्र, जनतेची मागणी लक्षात घेऊन पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिली आहे.
लातूरातील न्यू एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या मैदानावर आयोजित आझादी का अमृत महोत्सवात ते बोलत होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय अन्न महामंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याशिवाय, देशातील कुपोषण निर्मूलनासाठी नवीन फोर्टिफाइड तांदूळ विकसित करण्यात आला आहे.
या भातामध्ये व्हिटॅमिन बी 1 ते बी 12 असते. सध्या फक्त अंगणवाड्यांनाच तांदूळ वाटण्यात येणार आहे. भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने हा तांदूळ 2024 पर्यंत सर्वांना उपलब्ध होणार असल्याची माहिती सुधाकर श्रृंगारे यांनी दिली आहे.