उदगीर: येथील भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या मिनाक्षी पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. या निवडीबद्दल मिनाक्षी पाटील यांनी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी खा.रूपाताई पाटील, खा.सुधाकर श्रगारे, आ.अभिमन्यू पवार, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी आ.गोविंद केंद्रे, लोकसभा प्रभारी राहुल केंद्रे यांचे आभार व्यक्त
केले आहेत.
मिनाक्षी पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीरचे माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, भगवानराव पाटील तळेगावकर, नामदेवराव कदम, नंदकुमार नळदवार, बापूराव राठोड, महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, डॉ. धनाजी कुमठेकर, रोहिदास गंभीरे, संजय पाटील मलकापूरकर, गणेश गायकवाड, राजकुमार मुक्कावार, झुंजार पाटील, सत्यवान बोरोळकर, सुनिल सावळे, मंदाकिनी जिवने, वसंत शिरसे, सरोज वारकरे, अँड. दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, पंडित सुर्यवंशी, बबिता पांढरे, उदयसिंह ठाकूर, संजय पत्तेवार, विलास बोके आदींनी अभिनंदन केले आहे.