मुंबई : उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाच आता एनसीबीचे झोनल अधिकारी नवाब मलिक यांच्या मेहुणीने दाखल केलेल्या तक्रारीने मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्वीट करत मलिकांनी सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर हिची बहीण आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्याविषयी ट्वीट केले होते. हे ट्वीट करतानाच मलिक यांनी समीर वानखेडे यांना प्रश्नही विचारला होता.
त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, प्राप्त झालेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 354, 354 ड, 503 यासह स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा-1986 च्या कलम 4 खाली गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि नवाब मलिक असा कलगीरतुरा रंगलेला दिसत आहे.
मलिक यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) एक ट्वीट करत समीर वानखेडेंना प्रश्न विचारला होता. या ट्वीटमध्ये मलिकांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीचा उल्लेख केलेला होता.
याच ट्वीटवरून आता वानखेडे यांच्या मेहुणीने मानहानी केल्याचा आरोप करत मलिकांविरुद्ध तक्रार दाखल केली.