WhatsApp युजर्ससाठी अनेक फीचर्स लाँच करत असतं. त्यापैकी WhatsApp Status फीचर अनेकांमध्ये पॉप्युलर आहे. अनेक युजर स्टेटसवर आपले फोटो-व्हिडीओ ठेवतात.
हे स्टेटस 24 तासांपर्यंत असतं. यावर रिप्लाय करता येऊ शकतो, परंतु ते सेव्ह किंवा डाउनलोड करता येत नाही. पण एका जबरदस्त ट्रिकद्वारे WhatsApp Status डाउनलोड करता येऊ शकतं.
● WhatsApp वर स्टेटस शेअर करण्यासाठी कोणतीही ट्रिक नाही. फोटोचा स्क्रिनशॉट घेऊन तो सेंड करता येऊ शकतो. परंतु स्टेटसवर व्हिडीओ असल्यास तो शेअर करता येत नाही. पण एका ट्रिकद्वारे व्हिडीओ सेव्ह करू शकता.
● सर्वात आधी Android Smartphone वर Google Files नावाचं App डाउनलोड करा आणि ओपन करा. iOS युजर्स एखाद्या इतर फाइल मॅनेजर अॅप्लिकेशनचा वापर करू शकतात.
● Google Files App मध्ये सर्वात वर एक मेन्यू दिसेल. त्यात Settings मध्ये Show Hidden Files पर्याय ऑन करा.
● त्यानंतर डिव्हाइसच्या File Manager मध्ये जा. Internal Storage ऑप्शनवर क्लिक करा.
● आता WhatsApp सिलेक्ट करा. त्यानंतर Media आणि नंतर स्टेटस पर्यायावर क्लिक करा.
● स्टेटस फोल्डरमध्ये दिसेल. त्यानंतर व्हिडीओ फोल्डरमध्ये सेव्ह किंवा डाउनलोड करुन शेअर करता येईल.
● या पद्धतीने App डाउनलोड करुन कोणाचंही स्टेटस सेव्ह करू शकता तसंच इतरांसह शेअर करू शकता.