पाच गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली : ना.संजय बनसोडे

0
800
Sanjay Bansode

जळकोट : शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत जळकोट तालुक्यातील जगळपूर, हावरगा, डोमगाव ,वांजरवाडा, जिरगा ,चेरा, धामणगाव या गावातील पाणी पुरवठ्यासाठी शासनाने २० कोटीचा निधी मंजूर केला आहे.

यामुळे या गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.

या योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणी देणे आवश्यक आहे नवीन जोडणी बाबत आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असणार आहेजल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

जळकोट येथील या ८ गावांचा नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषामध्ये असल्यामुळे व सदर योजनेची ढोबळकिंमत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता त्यास मंजुरी देण्यात आली.

जळकोट तालुक्यातील या आठ गावांसाठी ही योजना मंजूर झाल्यामुळे गावातील अनेक वर्षाचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे ग्रामीण भागामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला प्रतिव्यक्ती ५५ लिटर प्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या योजनेचा फायदा या गावातील जवळपास दोन लाख लोकांना नागरिकांना होणार असून ही योजना त्वरित कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

जळकोट तालुक्यातील या गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबीडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव, माजी उपसभापती गोंिवदराव माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, माजी सरपंच धनंजय शेळके, बाजार समितीचे संचालक दिलीप कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार, संचालक गजानन दळवे, विश्वनाथ इंद्राळे, पांडुरंग माने, सरपंच बालाजी आगलावे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शाम ढोबळे, सरपंच विकास बुके, सरपंच पुटेवाड, ईश्वर बेंबरे, आकाश वाघमारे, आदीसह या गावातील नागरिकांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here