देवणी : देवणी नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयात १७ प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात आला आहे. परिणामी या आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधणा-या इच्छुकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.
देवणी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सोडतीत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून एकूण १७ जागांसाठी होणा-या निवडणुकीत ९ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तर ८ जागांवर पुरुष अथवा स्त्री उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
एकूण सतरा जागांसाठी होणा-या निवडणुकीत प्रभाग क्र. १ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहेत, तर प्रभाग क्र २, ३, ९, १२, आणि १७ हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
तर प्रभाग क्र. ४, ६, ७ आणि १४ हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक ८ आणि ११ हे नागरिकाचा मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्र. ५ आणि ११ हे नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
तर प्रभाग क्रमांक १५ आणि १६ हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
देवणी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत नियंत्रक म्हणून देवणी तहसीलदार सुरेश घोळवे व सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी एस. ए. बोंदर व तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.