जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर येथे रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
46
Latur on occasion of World Senior Citizens Day

लातूर : दरवर्षी 1 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून रविवार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल बहुद्देशीय सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

समाज कल्याण सहायक आयुक्त आणि अपोलो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुद्देशीय सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता याचठिकाणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम होईल.

जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनमोल सगर, समाज कल्‍याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त अविनाश देवसटवार, जेष्ठ नागरिक संघ दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष बी. आर. पाटील, जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.बी.जोशी, लातूर जिल्हा जेष्ठ नागरिक संघांचे सचिव प्रकाश धादगिने व ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबीरास व मुख्य कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या लातूर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here