उदगीरात वृक्ष प्रेमींनी अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा करत वटवृक्षास वाहिली श्रद्धांजली

0
408
उदगीर बातमी

उदगीर : उदगीर शहरात विकासाच्या आड येणाऱ्या सर्व झाडांची बिनधास्त कत्तल करण्यात येत आहे. येथील पंचायत समितीच्या आवारात असलेले अतिशय जुने आणि मोठे वडाचे झाड (दि.8 रोजी) विनाकारण झाड तोडून टाकले. अनेक आंदोलन, राजकीय व सामाजिक आंदोलनांचा साक्षीदार असणारा वट वृक्ष तोडून टाकले. या वट वृक्षास अधिकाऱ्याच्या नावाने शिमगा करत वृक्ष प्रेमींनी श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी (दि.6 रोजी) काही वृक्ष व पर्यावरण प्रेमी तरुणांनी उदगीर शहरात होत असलेल्या अवैध वृक्ष तोड बाबत न.प. चे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांची भेट घेतली होती.

तेंव्हा त्यांनी वृक्ष प्रेमी ना तीन दिवसात तोडलेल्या झाडाबाबत समिती गठण करून कार्यवाही करू असे आश्वासन देत त्यांची बोळवण केली होती. त्या नंतर मंगळवार सकाळीं पंचायत समितीच्या आवारातील जुने वट वृक्ष तोडण्यात आले, या वृक्ष तोडीची कोणाला कल्पना नाही. मुख्याधिकारी यांनी काय कार्यवाही केली? कुठली समिती स्थापन केली? कोणता अहवाल तयार केला, याची कोणाला काहीही माहिती नाही.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी शहरातील वृक्षतोड बेफाम करीत आहेत. याचा निषेध म्हणून वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन आज (दि.11 रोजी) संध्याकाळी 5 वाजता तोडलेल्या वट वृक्षास श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम ठेवला होता. त्या प्रमाणे आज तोडलेल्या वट वृक्षास हार घालून वृक्ष प्रेमीनी अधिकाऱ्याच्या नावाने शिमगा करत वट वृक्षास श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळेस राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरुजी, गुरूप्रसाद पांढरे, अजित शिंदे, मोतीलाल डोईजोडे, फिरोज शेख, अजित पाटील, अहमद सरवर, दत्ता पाटील, मनोज पुदाले, संतोष कुलकर्णी, नरेश सोनवणे, बालाजी सुवर्णकार, ओंकार गांजूरे, कपिल शेटकार, महेश तोडकर, महेश होनराव, विशाल स्वामी, अजय कबाडे, सुशील माका, अमित पसारे, अक्षय पसारे, विशाल चव्हान, तेजस अंबेसंगे, शफीक सोफी, विश्वा बिरादार, शिवा उप्परबावडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थीनी सह अनेक वृक्ष प्रेमीनी मुख्याधिकारी यांच्या भूमिके बाबत नाराजी व्यक्त करत बोंब मारत त्यांचा निषेध ही केला, एक मिनिट स्तब्ध थांबून या वृक्षास श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here