चाकूरजवळ ट्रॅव्हल्स पेटली, थोडक्यात बचावले प्रवासी

0
825

लातूर : नरसी नायगावहून पुण्याला जाणाऱ्या गोदावरी ट्रॅव्हल्स क्र. एमएच २० डीडी ७७०७ ने चाकूर तालुक्यातील चापोली गावानजीक पेट घेतल्याची घटना घडली.

ही ट्रॅव्हल जेव्हा चापोली जवळ आली तेव्हा ट्रॅव्हलमध्ये असलेल्या एका प्रवाशाला काही तरी जळत असल्याचा वास आला.

यानंतर चालकाने गाडी थांबवून बघितले असता, स्पार्किंग असल्याचे सांगून गाडी पुढे नेत लातूररोड नजीक थांबवली. तेव्हा गाडीने पेट घेतला होता.

ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी गाडीत असलेले सर्व २८ प्रवासी तात्काळ खाली उतरले.

अनेकजण आरडाओरड करीत सैरावैरा धावत होती. घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली. बस पेटल्याचे ग्रामस्थही मदतीला धावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here