कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

0
376

लातूर : अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशांनुसार राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, दि.12 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सदर रोजगार मेळावा प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन करणे अनिवार्य झाले होते. त्याचा विपरीत परिणाम उद्योग / व्यवसाय यांच्यावर झाला होता. परंतू, आता राज्यातील सदर उद्योग / व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत किंबहुना काही उद्योग पुन्हा सुरु झालेही आहेत.

त्यामुळे रोजगाराच्या पुन:श्च विविध संधी तसेच, विशेषत: कोविडच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग / व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होत आहेत.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायरॲप्लायन्सेस, महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रा. लि., आरएसबी ट्रान्समिशन इं. प्रा. लि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रा. लि., इ. तसेच लातूर जिल्हयातील जय इंजिनिअरिंग वर्क, पेस स्कील ट्रेनिंग सेंअर, क्रीस्टल हयुमन कॅपीटल सर्व्हीसेस, आयसीआयसीआय सेल्स अकॅडमी सारख्या नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्या मधील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत व अजूनही काही चांगल्या आस्थापना यामध्ये सहभाग नोंदविणार आहेत.

सर्वसाधारणपणे ९ वी पास पासून पुढे किंवा १० वी व १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा ग्राज्युएट, पोस्ट ग्राज्युएट तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी या आयुक्तालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की,या संधीचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छुक युवक-युवतींनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

होमपेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्रीकरुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे यथावकाश कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

राज्यातील इच्छुक युवक युवतींनीपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या यासुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here