लातूरात स्थिर, अकोल्यात मात्र सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल ; शेतकऱ्यांसाठी महत्वाचा टप्पा

0
497

लातूर : दिवसाला सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत काय झाले याची उत्सुकता ही जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आहे तेवढ्याच प्रमाणात व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजकांना आहे.

कारण व्यापारी आणि उद्योजकांचे ( Soybean Rate) सोयाबीन दरवाढीबाबतचे सर्व अंदाज हे फोल ठरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून (Latur Agricultural Produce Market Committee) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत.

तर दुसरीकडे मुहूर्ताच्या दरावरुन जी अकोला बाजार समिती चर्चेमध्ये आली होती त्याच बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रमी दराच्या दिशेने आगेकूच करीत आहे. कारण बुधवारी या बाजार समितीमध्ये चक्क 8300 चा दर एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला मिळालेला आहे.

सध्या सोयाबीनच्या दराभोवतीची बाजारपेठेची उलाढाल आहे. यातच गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दराच कायम वाढ होत आहे.

दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ होत असताना लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर हे 6 हजार 450 वर स्थिरावलेले आहेत.

अकोलामध्ये सर्वाधिक दर

हंगामाच्या सुरवातीलाही अकोला बाजार समिती चर्चेत होती ती वाढीव दरामुळे. या बाजारसमितीने तब्बल 11 हजार 300 रुपये हा मुहूर्ताच्या सोयाबीनला दर जाहीर केला होता.

मात्र, त्यानंतर दरात कमालीची घट झाली होती. बुधवारी याच बाजार समितीमध्ये गणेश सांकूदकर या बाभूळगाव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8 हजार 300 रुपये प्रति क्विंटला दर मिळालेला आहे.

या शेतकऱ्याने 12 पोते सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. सोयाबीन हे चांगल्या प्रतिचे असल्याने हा दर मिळाला आहे. सरासरी दर हा 6 हजार 400 रुपयेच चालू आहे. मात्र, अशीच आवक होत राहिली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे.

घटती आवक, चढे दर

सोयाबीनला सरासरी 6 हजार 400 चा दर मिळत आहे. असे असतानाही सलग तिसऱ्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही कमी होत आहे.

बुधवारी 13 हजार पोत्यांची आवक झाली होती तर आज (गुरुवारी) केवळ 10 हजार पोत्यांची आवक झाली आहे. वाढत्या दराचा सोयाबीनच्या आवक काही परिणाम होताना पाहवयास मिळत नाही.

शिवाय अधिकचा दर पाहिजे असल्यास सोयाबीनची आवक ही कमीच होणे गरजेचे असल्याचे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे गरज असल्यावरच सोयाबीनची विक्री असाच निर्धार शेतकऱ्यांनी केला असल्याचे सध्याच्या आवकीवरुन लक्षात येत आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6175 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5850 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6122 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 7032, चमकी मूग 7150, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7370 एवढा राहिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here