उदगीर : वायदे बाजारात सोयाबीनच्या दराने एकाच दिवशी तीनशे रुपयांपेक्षा अधिक उसळी घेतल्याने सोमवारी सोयाबीनच्या दर वधारले आहेत .या दरवाढीमुळे शेतक-याच्या अशा उंचावल्या असून येणा-या काळात हीच परिस्थिती राहिली तर शेतक-याच्या हातात अधिकचे पैसे दिसणार आहेत.
येथील मार्केट यार्डात दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तापासून दररोज सोयाबीनची आवक १० ते १५ हजार पोत्याच्या दरम्यान होत होती आवक कमी असली तरी दर मात्र ५ हजाराच्या घरातच होते त्यामुळे शेतक-यामध्ये नाराजी पसरली होती.
दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर व दिवाळी झाल्यानंतर बाजारपेठेत सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते परंतु यंदा हंगाम संपत असतानाच सोयाबीनने विक्रमी १० हजार प्रती क्वींटलचा टप्पा गाठला आहे.
त्यामुळे तालुक्यातील सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली होती. पेरणी वेळेवर झालीनंतर पीकापुरता समाधानकारक पाऊस पडत गेल्याने पीक बहारदार आले होते त्यातच कांही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे सोयाबीन डागी झाले होते.
हंगाम सुरू होण्याच्या दरम्यान सोयाबीन आठ हजार रुपये प्रतिकिं्वटल दराने विक्री झाल्यामुळे शेतक-यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु राशी सुरू झाल्या व बाजारात आवक होत गेली सोयाबीनचे दर घसरत गेले हेदर शेवटी दिवाळीपर्यंत पाच
हजार रुपये प्रति क्ंिवटल पर्यंत खाली आले होते.
यामुळे शेतकरीचिंताग्रस्त झाला होता. दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात चांगला दर मिळेल या आशेने शेतक-यांनी त्यांच्या जवळील सोयाबीन बाजारात आणले होते परंतु प्रत्यक्षात बाजारात ५ हजार २०० च्या वर दर गेलाच नाही.
त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक या द्विधा मनस्थीतीत शेतकरी होता तर दुसरीकडे साठा निर्बंधामुळे व्यापारी खरेदी करून साठवणूक करण्याच्या मनस्थीतीत नसल्याने तेही तठस्थ होते.
सोयाबीनचे दर मध्यप्रदेशातील बाजारपेठेवर अवलंबून
देशातील सर्वात मोठी सोयाबीनची बाजारपेठ असलेल्या मध्यप्रदेशातील कारखानदारांनी सोयाबीन खरेदीसाठी त्यांचा मोर्चा आता महाराष्ट्राकडे वळविल्याने व सोयाबीनच्या पेंडीला असलेली मागणी त्यामुळे दरात वाढ झालेली आहे जोपर्यंत मध्यप्रदेशातील कारखानदार सोयाबीनची खरेदी करीत राहतील तोपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे
– अनिरुद्ध गुरुडे, व्यापारी