श्री संत मारुती महाराज साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना २२०० रुपये पहिला हप्ता जाहीर

0
590

औसा : गेली सात वर्षापासुन बंद असलेल्या व मांजरा परिवाराने ताब्यात घेऊन यावर्षी गाळप सुरु केलेल्या औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज साखर कारखान्याकडे दि. १ ते १५ डिसेंबरपर्यंत ऊस गाळप झालेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून २२०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती माहिती संत मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे व्हॉईस चेअरमन शाम भोसले यांनी दिली.

श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याने गेली २२ दिवसात तब्बल ३३००० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून ३३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करत एक वेगळा पॅटर्न निर्माण केला असून औसा तालुक्यातील शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, व्यापा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान मांजरा परिवाराने जो शब्द दिला होता उस व दराच्या बाबतीत तो तंतोतंत पालन करीत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला असुन उसाची तोडणी मांजरा परिवाराच्या काटेकोर नियमानुसार करण्यात येत आहे.

कारखान्याची वचनपूर्ती पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाली तर फलश्रुती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आमदार धीरज देशमुख यांची खंबीर साथ या साखर कारखान्यास झालेली आहे.

दरम्यान मांजरा परिवारातील धाकटा भाऊ म्हणून मारुती महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता मांजरा परिवाराप्रमाणे मिळाल्याने उस उत्पादक शेतक-यांंकडून तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. यामुळे विकासाच्या नव्या वाटेवर औसा तालुका नकाशावर दिसत आहे.

औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज साखर कारखान्याचे गाळप गेली सात वर्षापासुन बंद होते मागच्या दोन वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यात ऊस उत्पादक सभासदांनी मोठा विश्वास ठेवून लोकनेते विलासराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या मारुती महाराज साखर कारखान्याचे पुर्ण पॅनल निवडून मांजरा परिवाराच्या ताब्यात पुन्हा कारखाना दिला.

निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सहकार पॅनलचे प्रमुख पालकमंत्री अमित देशमुख यांनी आम्हाला आशिर्वाद द्या आम्ही चालु करून देऊ योग्य भाव देवू असा शब्द दिला होता; तो शब्द पूर्ण पाळून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्याबरोबरच विकासाची गंगा या तालुक्यांत सुरु झाली आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

मारुती महाराज साखर कारखान्या च्या कार्यक्षेत्रात सध्या ५.५० लाख टन ऊस उपलब्ध आहे त्यात सभासदांचा ४००० हेक्टरवर तीन ते साडे तीन लाख टन ऊस उपलब्ध असुन ज्या उसांची नोंदणी केली आहे अजून नोंदणीसाठी अर्ज येत आहेत.

परिवाराच्या नियमानुसार उसाचे गाळप सुरु आहे. मारुती महाराज साखर कारखान्याची गाळप क्षमता २ लाख मेट्रिक टन असून तरीही कारखाना जवळपास अडीच ते तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूलगे उपाध्यक्ष शाम भोसले, सरव्यवस्थापक दत्ता शिंदे यांनी दिली.

या साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक, तोडणी कामगार यांच्या सहकार्याने गाळप सुरु असून सर्वांचे सहकार्य मिळाले आहे, असे यावेळी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here