श्रद्धा जगताप यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्यपदी निवड

0
150

उदगीर : तालुक्यातील महिला सक्षमीकरणासाठी सतत कार्यरत असलेल्या श्रद्धा ज्ञाते जगताप यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महिलांच्या सर्वांगीण प्रगती सोबतच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा पाया मजबूत व्हावा म्हणून धडपड करणाऱ्या दमदार महिला नेत्या अशी श्रद्धा जगताप यांची ओळख आहे.

उदगीर शहर आणि परिसरातील महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. महिला सक्षमीकरण हा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असून महिला सक्षम

आणि स्वावलंबी झाल्या तर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते, त्यासाठी पक्ष पातळीवर विविध उपक्रम राबविले जातात, त्याचे नेतृत्व स्थानिक पातळीवर सक्षम हातात दिले जाते.

श्रद्धा जगताप यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील महिला आणि मुलींसाठी विविध उपक्रम राबवून सरकार आणि महिला यांच्यात समन्वय साधून अनेक योजना लोकाभिमुख केल्या आहेत.

उदगीर शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील महिला व मुलींमध्ये त्यांनी खूप मोठे काम केले आहे. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे, हा श्रध्दा जगताप यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेवून भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रध्दा जगताप यांच्यावर पक्षाची ‘महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य’ म्हणून जबाबदारी सोपविली आहे.

त्यांच्या कडून महिलांचे कुशल संघटन पक्ष वाढीसाठी महत्वाचे आहे, आगामी काळात त्यांच्या कडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न व्हावेत अशी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाजपाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या श्रध्दा जगताप यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्यपदी निवड केली आहे.

त्यांच्या निवडी बद्दल भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा उत्तरा कलबूर्गे, मिनाक्षी पाटील, उदगीर तालुका उपाध्यक्षा शिवकर्णा अंधारे, श्यामला कारामुंगे, सरोजा वारकरे, पुजा लासूरे, बबीता पांढरे, सुनिता स्वामी, मंदाकिनी जिवने, अनिता बिरादार, फरजाना शेख यांच्यासह महिला मंडळांच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here