तोंडार, हाळी, लोणी, सोमनाथपूर, मादलापूर येथील 48 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी : राज्यमंत्री संजय बनसोडे

0
463

लातूर : उदगीर तालुक्यातील तोंडार, हाळी, लोणी, सोमनाथपूर, मादलापूर येथील नळ योजनेस शासनाने मान्यता दिली आहे.

मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रधान सचिव (पाणी पुरवठा) यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चाधिकार समितीने ही मान्यता दिली असून, या पाच गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे, अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत उदगीर तालुक्यातील अनुक्रमे तोडांर या गावाच्या योजनेसाठी संगामचीवाडी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने रु. 6.52 कोटी आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली आहे.

तसेच हाळी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी रु. 7.71 कोटी तरतुद करण्यात आली असून, तिरु प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

लोणी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी रु. 9.15 कोटीची मंजुरी दिली, असून संगमाचीवाडी साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

सोमनाथपूर पाणीपुरवठा योजनेसाठी देवर्जन मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी रु. 13.74 कोटी या योजनेसाठी मान्यता दिली आहे.

मादलापूर पाणी पुरवठा योजनेसाठी रु. 11 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या गावाला देवर्जन मध्यम प्रकल्प या प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

उदगीर तालुक्यातील या पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून, या भागातील नागरिकांचे अनेक वर्षापासून या योजनेसाठी मागणी केली होती.

राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने या योजनेला मंजुरी दिली असून या योजनेचे कामाची सुरूवात होणार आहे, अशी माहिती अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here