उदगीर : उदगीर शहरात समता नगर मधील मागच्या तीस वर्षापासून भेडसावणारा विजेच्या तारांचा प्रश्न अखेर सुटला आहे.
रेल्वे स्टेशन फिडर लाईन आणि मोघा फिडर लाईन समता नगर नागरीवस्तीवरून जाणारी विद्युत वाहिनी हटविण्याच्या कामाचे उद्घाटन न.प.चे शिक्षण सभापती व या प्रभागचे नगरसेवक नागेश अष्टुरे यांच्या हस्ते झाले.
समता नगर मधील 11kv आणि 33kv रेल्वे स्टेशनला जोडणारी विद्युत लाईन आणि मोघा फिडर मधून 10 ते 12 गावाना जोडणारी उच्च दाबाची विद्युत पुरवठा करणारी लाईन आहे. ती सरधोटपणे जात असल्यामुळे अनेक घरांवरून व रोडच्या मध्यभागामध्ये उच्च दाबाच्या तारा आसल्यामुळे समता नगर मधीन नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते.
ही समस्या मागच्या तीस वर्षांत सतावत होती. या वीज वाहिन्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
समता नगर व प्रभावित परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन वीज महामंडळाकडे अनेकदा तक्रार, अर्ज देऊनही त्यांच्या तक्रारींना दाद दिली नाही.
अनेक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला तरी प्रश्न मार्गी लागत नव्हता. नगरपालिकेच्या निवडणुकीत हा प्रश्न ऐरणीवर यायचा पण आतापर्यंत हा प्रश्न सुटू शकला नाही.
मागच्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार नागेश अष्टुरे यांनी नागरीकांना हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते व त्यासाठी वेळोवळी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत हा विषय मांडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता.
नागरीवस्तीवरून जाणाऱ्या धोकादायक वीजवाहक तारा हटविण्याच्या कामाची सुरुवात नगरसेवक नागेश अष्टुरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अनेक वर्षांपासून चा प्रश्न सुटल्यामुळे सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
याप्रसंगी उपस्थित इंजिनिअर कुलकर्णी, मथुरा इलेक्ट्रिकलचे प्रतिनिधी संदिप तेलंग, चंद्रशेखर माने, रामभाऊ बिरादार, सुनील महाराज, पाटील, दिगंबर शिंदे, शेषराव बिरादार, सचीन गायकवाड, विरभद्र स्वामी, अनिल वाडीकर, अविनाश जाधव, कल्लप्पा स्वामी, बालाजी गाजरे, नरसिंग कंदले, गणेश सोपा, ब्रिजेश जीवने, चंद्रकांत देवशेटे, राजू स्वामी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.