Pune Crime | जीव देण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपीला अटक

0
514

पुणे : Pune Crime : १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखविले. जीव देण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police) फिर्याद दिली आहे.

त्यावरुन पोलिसांनी मल्लेश विठ्ठल कांबळे (वय १९, रा. थिटे वस्ती, खराडी) याला अटक केली आहे. फिर्यादी यांची १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरी परत न आल्याने तिला कोणीतरी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार २१ नोव्हेबर रोजी मध्यरात्री साडेबार वाजता दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी IPC 363 कलमाखाली गुन्हा (Pune Crime) दाखल केला होता. तपासादरम्यान तिच्या ओळखीच्या कांबळे याने तिला पळवून नेले.

वडगाव शेरी येथील मोकळ्या रुममध्ये तिला तो घेऊन गेला. तिला आपण लग्न करु, असे आमिष दाखविले. तू माझ्यावर प्रेम केले नाही तर मी जीव देईन अशी धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध केले.

पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल करुन कांबळे याला अटक केली (Pune Crime) आहे. पोलीस उपनिरीक्षक मिसाळ तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here