जळकोट-उदगीर रस्त्यावरील तिरुका येथील अपघातात पोलिसाचा मृत्यू 

0
354

उदगीर : येथील विविध गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल तपासणीसाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, नांदेड येथे जमा करुन परत येताना तिरुका (ता.जळकोट) येथे पोलिस वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्या शहर पोलीस ठाण्यातील  कार्यरत हवालदार मच्छिंद्रनाथ वामनराव वर्टी (वय ४६) यांचा मंगळवारी (दि.३०) पुढील उपचारासाठी लातूरला घेऊन जाताना मुत्यु झाला आहे.

उदगीर शहर पोलिस ठाण्यात घडलेल्या विविध गुन्ह्यातील मुद्देमाल नांदेड येथील न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेत सी.ए. तपासणी जमा करण्यासाठी पोलीस ठाण्यातील शासकीय वाहन (एमएच २४ एडब्लु ९३४९) घेऊन चालक पोलिस हवालदार वर्टी पोलिस कर्मचारी गोपाळ भालेराव सोमवारी (ता.२९) नांदेडला गेले होते.

सायंकाळी मुद्देमाल जमा करुन परत येते वेळेस जळकोट – उदगीर महामार्गावरील तिरुका येथे वळण रस्त्याजवळ पुढुन येणार्‍या वाहनाची लाईट पडल्यामुळे रस्त्याचा अंदाज न गाडी पलटी होऊन अपघात झाला. यामुळे दोन्ही कर्मचारी जखमी झाले होते.

जखमी अवस्थेत त्यांना उदगीरच्या उदयगिरी खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. हवालदार वर्टी यांच्या मानेचा मणका मोडल्यामुळे लातूरला उपचारासाठी घेऊन जाताना वाटेतच त्यांचा मुत्यु झाला. यामुळे शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसह नागरिक हळहळ व्यक्त करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here