अयोध्या : अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये मुलीने तिच्या माजी पतीसह ३ जणांना जबाबदार धरले आहे.
अयोध्येत पंजाब नॅशनल बँकेत पब्लिक ऑफिसर म्हणून काम करत असलेल्या एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत एका टाक्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये तिने तीन जणांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
यामध्ये एक नाव विवेक गुप्ता यांचे आहे, ज्याच्यासोबत मुलीचे लग्न ठरले होते. पण नंतर विवाह तुटला. तर सुसाईड नोटमधील उर्वरित २ नावं धक्कादायक आहेत.
उपमहापौराना अमित देशमुखांचे काँग्रेस प्रवेशाचे आवतन आणखीन एक लिंगायताची राजकीय माती करण्यासाठी ?
यामध्ये पहिले नाव आशिष तिवारी एसएसएफ प्रमुख लखनऊ असे लिहिले आहे, तर दुसरे नाव अनिल रावत पोलीस फैजाबाद असे लिहिले आहे. अयोध्या पोलिसांनी विवेक गुप्ता याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
दोन दिवसांनी शेजाऱ्यांनी उघडला दरवाजा
श्रद्धा गुप्ता असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तिचा मृतदेह शनिवारी तिच्या खोलीत ओढणीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या घराचा दरवाजा २ दिवस उघडला नाही आणि फोनही उचलला नाही तेव्हा शेजाऱ्यांनी घरमालकाला माहिती दिली आणि त्याने पोलिसांना बोलावले.
अखिलेश यादव यांनी केली चौकशीची मागणी
या प्रकरणी अखिलेश यादव यांनी ट्विट करून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्याप्रकारे पोलिसांवर थेट आरोप केले जात आहेत.
राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कटू सत्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये थेट आयपीएस अधिकाऱ्याचे नाव घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
- Maharashtra Postal Department Recruitment 2021 : महा डाक विभाग क्रीडा कोटा भरती 2021
- ठाकरे सरकार पीडितेच्या जखमांवर मीठ चोळत आहे : चित्रा वाघ
- सीताफळाच्या लागवडीकडून समृद्धीकडे; जानवळ येथील येलाले यांचा यशस्वी प्रयोग
- राज्य सरकारचा निर्णय : लातूर महानगरपालिकेत आणखी ११ सदस्य वाढणार