PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळू शकतात 6 हजारा ऐवजी 12000 हजार, PM KIsan योजनेचे पैसे दुप्पट करणार मोदी सरकार !

0
404

नवी दिल्ली : PM Kisan Samman Nidhi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आणि म्हटले की, त्यांचे सरकार तिनही कृषी कायदे (Three Farm Laws) रद्द करेल आणि आगामी संसद सत्रात (Parliament Session) याबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

केंद्र सरकार यासाठी कमिटी गठित करणार आहे. तर, कृषी कायदे रद्द करण्याच्या वृत्तादरम्यान पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत मिळणारे पैसे सुद्धा दुप्पट होऊ शकतात.

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांना लवकरच मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये तीन हप्त्यात मिळू शकतात.

पैसे मिळतील किंवा नाही असे तपासा

जर तुम्ही PM Kisan स्कीमसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.

यादीत असे तपासा तुमचे नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here