उदगीरच्या रंगराव पाटील आडत बाजारात तुरीची ऑनलाईन नोंदणी सुरू

0
600

लातूर : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीचा लाभ जिल्ह्यात उत्पादीत होणा-या तूर उत्पादक शेतक-यांना व्हावा यासाठी लातूर जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात १८ हमीभाव खरेद केंद्र दि. २० डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहेत.

तूर हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची ऑनलाईन नोंदणी करून विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्वि. ६ हजार ३०० रुपये दर मिळणार आहे.

जिल्ह्यात ९७२.३ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी खरीप हंगामात जमिनीतील ओलावा पाहून ९४.९४ टक्के म्हणजेच ५ लाख ८१ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती. यात तुरीची ८५ हजार ६०९ हेक्टर पेरणी झाली होती. सध्या तूरीचे पीक कांही ठिकाणी परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. तर कांही ठिकाणी तुरीची काढणी व मळणी सुरू आहे. मळणी झालेली नवीन तूर शेतकरी आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. तुरीला ६ हजार १७० रुपये प्रतिक्वींटल दर मिळत आहे. तो हमी भावाच्या १५० रुपये प्रतिक्विंटल कमी मिळत आहे.

लातूर जिल्ह्यात तूर या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी १८ केंद्र सुरू केले आहेत. त्यामुळे शेतक-यांना तुरीची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

खरीप हंगामातील तुरीची शेतक-यांना जागृती प्रगती प्रगती बिजोत्पादन प्र. प. सह. संघ म. लातूर खरेदी केंद्र लातूर) सह ख. वि. संघ म. उदगीर, स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर 3. ओसा ता. शे सह ख. वि. संघ. म. ओसा, अहमदपूर वि. का. से. सह. सो. लि. अहमदपूर, हालसी (तु.) वि. का. से. सह. सं. म. हालसी (तु.), चाकूर ता. सह.ख. वि. संघ. म. चाकूर, रेणुका शं. सह ख. वि. संघ म. रेणापूर, हालको वि. का. से. सौ. म. हालकी, भोपणी वि. का. से. सह. संस्था म. भोपणी, रंगराव पाटील कृ. उ. (खाजगी) बा. स. लोणी उदगीर, सताळा (खु.) वि. का. से. सह. संस्था म. सताळा, शिरुर ताजबंद वि. का. से. सह. सो. लि. शिरुर (ता.) अहमदपूर, जिजामाता मिरची प्रक्रीया पणन सह. संस्था सेलू ता. लातूर, विविध कार्यकारी सेवा संस्था खरोळा ता. रेणापूर, ता. ख. वि. संघ म. देवणी, विविध कार्यकारी सेवा सह संस्था म. शिदगी, अलोक संजिवनी फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोडुसर कंपनी मुरुड अकोला ता. लातूर, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म. उमरगा (हा.) खरेदी केंद्रावर दि. २० डिसेंबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here