आता भारतात एन्ट्री करणार Redmi Note 11 Series स्मार्टफोन, पाहा कधी लाँच होणार

0
382

नवी दिल्लीः रेडमीच्या लेटेस्ट नोट ११ सीरीज स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या यूजर्ससाठी एक गुड न्यूज आहे.

Redmi Note 11 सीरीज़ला चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात लाँच करण्यात आले होते. आता रेडमी कंपनी या नवीन जनरेशन बजेट फोनला भारतात एका वेगळ्या नावाने लाँच करणार आहे.

Redmi Note 11 ला भारतात Redmi Note 11T 5G च्या रुपात लाँच करण्याची शक्यता आहे. तर Redmi Note 11 Pro च्या Xiaomi 11i आणि Redmi Note 11 Pro Plus च्या Xiaomi 11i हायपरचार्जच्या रुपाने लाँच करण्याची शक्यता आहे. एका नवीन रिपोर्टनुसार, Redmi Note 11 सीरीज़ला ग्लोबल Q1 2022 मध्ये लाँच केले जाणार आहे. याचाच अर्थ भारतात लाँच रेडमी नोट १० सीरीज मार्च महिन्याच्या जवळपास लाँच होवू शकतो.

२०० च्या पहिल्या तिमाहित व्हिएतनामच्या बाजारात येणार

Thepixel च्या एक रिपोर्टनुसार, Redmi Note 11 सीरीज़ 2022 च्या पहिल्या तिमाहीत व्हिएतनामच्या बाजारात येणार आहे. या रिपोर्ट मध्ये म्हटले की, नोट ११ सीरीज मध्ये व्हिएतनामच्या बाजारात एक वेगळी डिझाइन आणि फीचर्स असतील.

यात मीडियाटेक, डायमेंसिटी सीरीज चिपसेट शिवाय, स्नॅपड्रॅगन चिपसेट मध्ये पॅक करण्याची शक्यता आहे. परंतु, अजून हे स्पष्ट झाले नाही की, स्नॅपड्रॅगन चिपसेट व्हिएतनाम बाजारासाठी एक्सक्लूसिव्ह होणार की नाही.

चीन आणि भारत व्हेरियंट मध्ये सारखेच असू शकतात स्पेक्स
मॉनिकर मध्ये बदलाशिवाय, Redmi Note 11 सीरीज़ चे स्पेसिफिकेशन भारतात चीनी व्हेरियंटचे फीचर्स सारखेच असण्याची शक्यता आहे. Poco M4 Pro 5G ला ग्लोबल Redmi Note 11 5G चे रिब्रँडेड म्हणून लाँच करण्यात आले होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here