दिल्ली : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना २०२१ चा डॉ.विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन नवी दिल्ली चा “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार मिळाला आहे.
कोरोना च्या काळात अनेक गरजू गरीब लोकांना तसेच मराठी सिनेमा आणि मराठी टी.वी. मालिकेच्या अनेक कलाकारांची कोरोना च्या काळात उपासमारी होत होती त्यावेळी अनेकांना आर्थिक आणि अन्न धान्याची मदत वत्सला बळीराम सेवा भावी संस्था आणि बळीराम गायकवाड फाउंडेशन च्या वतीने माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केली आहे.
लातूर लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणत मास्क आणि आणि सेनीटायझरचे वाटप करून भटके विमुक्त समाज आणि दलित समाजातील गरजू लोकांना अन्न धान्याचे किट वाटप केले.
कोरोना काळातील अशा अनेक कामाची, मदतीची दखल घेऊन दिल्लीच्या डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने केंद्रीय भटके विमुक्त अभ्यास आयोगचे अध्यक्ष दादा भिकू रामजी इदाते, डॉ.ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, डॉ. मनीष गवई या मान्यवरांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देऊन प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.