नाशिक : Nashik Crime | महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ अखेर समोर (Nashik Crime) आलं आहे.
नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणाचा छडा लावला आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू कसा झाला? हा सवाल अनेक दिवस झाले अनुत्तरीत होता.
अखेर याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे (Sandeep Waje) यांनी पत्नी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
मात्र अखेर 10 दिवसाच्या तपासानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. डॉ सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजेला पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे नजीक जळालेल्या अवस्थेत आढळला होता.
गाडीत आढळलेला मृतदेह आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए (DNA) एकच असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले होते. दरम्यान यापूर्वी डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.
नाशिक पोलिसांच्या तपासानुसार, आता डीएनए (DNA) तपासातून ती माहिती समोर आलीय.
डीएनए एकच असल्याने आता डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हाडाचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला होता.
त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन जाळण्यात आल्याचा अंदाज होता. यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.