आजादी का अमृत महोत्सव निमित्त कायदेविषयक जनजागृती महामेळावा संपन्न

0
506

लातूर : आजादी का अमृत महोत्सव निमित्त अखिल भारतीय कायदेविषयक जनजागृती अंतर्गत महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय लातूर, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर व जिल्हा विधीज्ञ मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा जिल्हाधिकारी सभागृहात संपन्न झाला.

या मेळाव्यामध्ये अटल भूजल योजना (अटल जल) अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूर यांचे मार्फत चित्र प्रदर्शनी (स्टॉल) च्या माध्यमातून इमारती वरील पाऊस पाणी संकलन व विहीर, कूपनलिका पुनर्भरण याचे स्वयंचलित प्रात्यक्षीत दाखविण्यात आले.

या योजनेची माहिती बॅनर, पॉम्पलेट व पोस्टरच्या माध्यमातून माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा एस.बी. गायकवाड यांनी नागरीकांना व विविध शासकीय विभागांना देण्यात आली.

यावेळी पोकरा योजने अंतर्गत तीन शेतकऱ्यांना विहिरीसाठी भूजल उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. श्रीमती सुरेखा कोसमकर,पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,प्रोबेशनरी अधिकारी श्री. रहेमान, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती एस.डी.अवसेकर यांनी भेट दिली व पुनर्भरण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here