लातूरकरांची चिंता वाढली : परदेशातून आलेला व्यक्ती निघाला कोरोना पॉझिटिव्ह

0
383

लातूरः ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग (omicron variant) जगभरात झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रातही या नवीन विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासन प्रयत्न करत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करत आहेत. लातूर जिल्ह्यातही ५१ नागरिक परदेशातून आले आहेत.

करोना विषाणूच्या ओमियक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातही ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत असे असतानाच लातुरमध्ये अद्याप एकही ओमिक्रॉनचा रुग्ण सापडलेला नसला तर लातुरकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

लातुर जिल्ह्यामध्ये आजतागायत ५१ नागरिक परदेशातून आलेले आहेत त्यामध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत. तर उर्वरित ४७ नागरिक कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत.

त्यापैकी ४४ लोकांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सोळा जणांचा रिपोर्ट आला असून त्यातील एक जण व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आला आहे. परदेशातून आलेला व्यक्ती करोनाबाधित असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

लातूरमध्ये आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आहे की अन्य व्हेरिएंटचा आहे याबद्दल आरोग्य प्रशासनच साशंक आहे.

या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा अहवाल जिनोम सिक्वेन्ससिंगसाठी त्याचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठवण्यात आली असून याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

आता सध्याला पॉझिटिव्ह रुग्ण नेमका की डेल्टा व्हेरिएंटचा आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंटचा हे जीनोम सिक्वेन्ससिंगच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल नागरिकांनी घाबरून न जाता अश्या विषाणूवर लस हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे नागरिकांनी लस घेण्याचे, आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here