Latur Crime News : लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

0
492

लातूर: लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई करत चोरीस गेलेली तिजोरी व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 11 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना अटक केली आहे.

दिनांक 19/10/2021 रोजी 10.00 ते 20/10/2021 रोजी 06.00 च्या दरम्यान हरंगुळ (खु) शिवारात गेट नं. 111 वेअरहाऊस बार्शी रोड, लातूर इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस प्रा.लि. शाखा लातूर कंपनीचे वेअरहाऊसचा पत्रा कापून आत प्रवेश केला.

लॉकरमध्ये ठेवलेली एकूण रक्कम 12,32,694 रुपयांचे लॉकर, डिव्हीआर व राऊटरसह चोरट्याने चोरून नेले होते. या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी. येथे कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा उघडकीस आणने कामी पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधीकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे याचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी गुन्ह्यातील आरोपीच्या शोधकामी स्थानिक गुन्हेचे पथक तयार करण्यात आले होते.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती. मौजे पेडगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथून संशीयत आरोपी
1) भरत लक्ष्मण नागरे, रा.बोरगाव ता.करमाळा, जि.सोलापूर
यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केले असता सदर गुन्हा त्याच्या इतर साथीदार नामे
2) रायचंद परमेश्वर धाकतोड, रा.विट ता.करमाळा जि.सोलापूर.
3) परशुराम संभाजी घोडके, रा.पेडगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर

यांनी मिळून पोलिस स्टेशन एमआयडीसी येथील हरंगुळ (खु) शिवारात गट नं. 111 वेअरहाऊस बार्शी रोड, लातूर इंटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस प्रा.लि. शाखा लातूर कंपनीचे वेअरहाऊसचा चोरी केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीचे ताब्यातून १ पांढऱ्या रंगाची इंडीगो कंपनीची कार, १ पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप, ४ मोबाईल, गुन्ह्यात चोरीस गेलेली तिजोरी व रोख रक्कम रू.2,97,000/- असा एकुण रू.11,38,000/- रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलिस हवालदार राजेंद्र टेकाळे, राम गवारे, सुधिर कोळसुरे, पोलिस नायक नवनाथ हसबे, योगेश गायकवाड यांनी केली.

त्याचबरोबर पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले त्यांची टीम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज गायकवाड व त्यांच्या पथकाने सुध्दा मदत केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here