नवी दिल्ली : बिहार सरकारने सोमवारी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील जातींची आकडेवारी जाणून घेणे महत्त्वाचे असून त्यानुसार त्यांना सक्षम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
बिहारच्या जाती जनगणनेत 84 टक्के ओबीसी, एससी आणि एसटी असल्याचे दिसून येते. केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी आहेत, जे भारताच्या बजेटच्या केवळ 5 टक्केच हाताळतात, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, या सर्व कारणांसाठी भारतातील जातींची आकडेवारी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक लोकसंख्या, अधिक अधिकार ही आपली प्रतिज्ञा आहे. बिहार सरकारने सोमवारी बहुप्रतीक्षित जात-आधारित जनगणनेचे निकाल जाहीर केले, ज्यामध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 63 टक्के इतर मागासवर्गीय आणि अतिशय मागासवर्गीय वर्ग असल्याचे दिसून आले.
Nanded News | शासनाच्या दुर्लक्षामुळेच नांदेडात मृत्यूचे तांडव
बिहारचे आयुक्त विवेक सिंग यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारची एकूण लोकसंख्या 13.07 कोटींहून अधिक आहे, ज्यामध्ये 36 टक्के EBC सर्वात मोठा सामाजिक वर्ग आहे. त्याखालोखाल ओबीसींची संख्या27.13 टक्के आहे.
या संदर्भात काँग्रेसने म्हटले आहे की, बिहारमधील जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली असून यावरून कोणत्या वर्गाची संख्या किती आहे, हे स्पष्ट झाले आहे. आज देशाला अशा जनगणनेची गरज आहे. जेणेकरून लोकसंख्येनुसार सहभाग निश्चित करता येईल.
त्यामुळे लोकनेते राहुल गांधी संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहेत. मनमोहन सिंग सरकारने जातीनिहाय जनगणना केली होती, पण मोदी सरकारने त्याची आकडेवारी जाहीर केली नाही.
आम्ही जातनिहाय जनगणना करू : काँग्रेस
अगदी कर्नाटकातील काँग्रेस सरकारनेही जातीनिहाय जनगणना केली आहे आणि आम्ही नेहमीच त्याला अनुकूल आहोत. मोदी सरकार जात जनगणना करणार नसेल तर 2024 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर प्रत्येक वर्गाला त्याचे हक्क मिळावेत यासाठी आम्ही जातनिहाय जनगणना करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Read More
Manipur Violence | मणिपूर हिंसाचारामागे म्यानमार दहशतवादी संघटना