राजा माने यांच्या ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ उपक्रमाचे जयंतराव पाटील यांनी केले कौतुक!

0
319

सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी हाती घेतलेल्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तक आणि चित्रकार नितीन खिलारे यांच्या व्यक्तिचित्र प्रदर्शन उपक्रमाचे राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी कौतुक केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रा.पद्माकर जगदाळे यांचे चिरंजीव प्रणव व नववधू सलोनी यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील येथे आले होते.

यावेळी बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान आणि प्रा.पद्माकर जगदाळे मित्रमंडळाच्यावतीने त्यांना ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेले त्यांचे रेखाचित्र भेट देण्यात आले.

राजा माने लिखित “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं” या पुस्तकात घेतलेल्या पाटील यांच्या रेखाचित्राची आकर्षक फ्रेम बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले व मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांच्या हस्ते भेट देण्यात आली.

प्रा.पद्माकर जगदाळे, प्रतापराव जगदाळे, निवृत्त आयएएस दिनकरराव जगदाळे,नंदन जगदाळे, जयकुमार शितोळे, शिवाजीराव सस्ते, मुरलीधर चव्हाण, सुनिल झाल्टे, प्रा.सुरेश लांडगे, राजाभाऊ रसाळ, प्रा.किरण देशमुख, प्रकाश काटुळे, प्रदीप देशमुख, प्रा.राजा बनसोडे, प्रताप पाटील, शहाजी फुर्डे, विजय पवार, कमलाकर पाटील, अजय शितोळे, गुणवंत खांडेकर, हरीभाऊ पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here