रासायनिक खत विक्रेते यांच्याकरीता देसी अभ्यासक्रम सुरू होणार

0
563

लातूर : जिल्हयातील रासायनिक खत विक्रेते यांच्याकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार मॅनेज, हैद्राबाद संस्थेच्यावतीने  देसी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी सर छोटूराम कॉलेज ऑफ ॲग्री इंजिनिरींग ॲन्ड टेक्नालॉजी, लोदगा. ता. औसा येथे 40 प्रशिक्षणार्थीच्या 2 बॅचेस तसेच प्राचार्य, कृषि महाविदयालय, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, ता.जि.लातूर येथे 40 प्रशिक्षणार्थीची 1 बॅच अशी एकूण 120 प्रशिक्षणार्थीची सुविधा करण्यात आली आहे.

सदरचा अभ्यासक्रम नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू करण्याचे नियोजन केलेल आहे. सदरचा अभ्यासक्रम केंद्रशासनाने सर्व रासायनिक खत विक्रेते यांना बंधनकारक केलेला आहे.

तेव्हा सर्व इच्छूक परवानधारक रासायनिक खत विक्रेते यांनी आपले नांव व इतर माहिती प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, लातूर यांचेकडे नोंदवावीत प्रत्येक रासायनिक खत विक्रेते यांनी रू 20 हजार पर्यत फि भरून आपले नांव नोंदवावे.

तसेच खते, बियाणे व औषधांची परवाना झेरॉक्स कॉपी, प्रो.पा चे आधारकार्ड, शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्र इ आवश्यक कागदपत्र व प्रकल्प संचालक आत्मा, लातूर यांचे नावे रू 20 हजार डि.डि. या प्रकल्प संचालक आत्मा, लातूर कार्यालयास सादर करावा.

अभ्यासक्रमाची फि दोन टप्प्यामध्ये भरता येईल नांव नोंदणीच्या वेळी रू 10 हजार व अभ्यासक्रम सुरू झाल्यावर उर्वरीत रू 10 हजार तरी इच्छूक कृषि सेवा परवानाधारक यांनी तातडीने आपली नावे प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाकडे नोंदवावीत असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा, डि.एस.गावसाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here