तुमच्या Debit Card चा PIN कसा कराल सेट? वाचा सोपी प्रोसेस

0
244

आपण बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर खातेधारकाला तात्काळ डेबिट कार्ड मिळतं, परंतु त्यासाठी अनेकांना Personal Identification Number जनरेट (how to generate Debit Card PIN online) करावा लागतो.

हा नंबर कसा जनरेट करता येतो, यासाठीच्या कोणकोणत्या पद्धती (how to generate Debit Card PIN online) आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ATM

पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्ड ज्या पॉकेटमध्ये आलं ते ओपन करा. त्यात चार अंकी पासवर्ड देण्यात आलेला असेल, त्यामुळे ATM मध्ये कार्ड इन्सर्ट केल्यानंतर तो पिन टाका.

त्यानंतर युजर्सला त्याच्या कार्डसाठी वैयक्तिक पासवर्ड म्हणजेच दुसरा स्वत:चा पिन सेट करावा लागतो. त्यावेळी सुरक्षित आणि लक्षात राहिल असा पिन सेट करा.

Net banking

साठी युजरने आपल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंगची वेबसाईट ओपन करायला हवी. त्यानंतर डेबिट कार्ड सेक्शनमध्ये (Debit Card PIN pin generation with Net banking) जाऊन जनरेट पिनच्या ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर स्क्रिनवर पिन जनरेशनसाठी तुम्हाला काही पर्याय देण्यात येतील ते फॉलो करून पिन जनरेट करा.

Phone Banking

डेबिट कार्डसाठी पिन जनरेशन हे फोन बँकिंगच्या माध्यमातूनही करता येतं. युजरने आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर कॉल करून डेबिट कार्ड पिन Activate करण्याचा पर्याय निवडून त्यात दिलेला चार अंकी पिन टाकून पिन रिसेट करायला करा.

डेबिट कार्ड पिन जनरेट करताना घ्या या गोष्टींची काळजी –

ही प्रक्रिया करताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर बँक खात्याची आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती कुणासोबतही शेयर करू नये.

पिन सेट करताना मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख सेट करू नये कारण त्यातून हॅकिंगचा धोका असतो. कधीही कोणत्याही कॉल किंवा मेसेजवर डेबिट कार्ड पिन शेयर करू नये.

कोणत्याही बँकेचे अधिकारी कधीही ग्राहकाच्या खात्याची माहिती फोनवर विचारत नाहीत. त्याचबरोबर काही ठराविक दिवसांच्या अंतराने पिन चेंज करत रहा.

विशेष म्हणजे बँकेने ग्राहकाला डेबिट कार्ड सोबत दिलेला चार अंकी पिन हा यूनीक कोड असतो. त्याची गरज प्रत्येक Transaction ला असते. त्यामुळे या पिनची गोपनीयता ठेवणं गरजेचं असतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here