Latur Crime News : उदगीरच्या उप जिल्हा रुग्णालयातील (Udgir Sub District Hospital) तपासणीच्या नावाखाली प्रसूती कक्षातील महिला रुग्णांचा विनयभंग (Molestation) केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येत रुग्ण येत असतात. या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचीही संख्या खूप आहे.
मात्र, या रुग्णालयात तपासणीच्या नावाखाली प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्णांचा विनयभंग होत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सचिन राजमाने नावाच्या ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन प्रसूती झालेल्या महिलांना तपासणीच्या नावाखाली प्रसूती वार्डच्या बाजूच्या रुममध्ये एकटी बोलावून त्यांचा विनयभंग करायचा अशी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.