मांजरी, सामनगाव, खोपेगाव, हरंगुळ (खु), पाखरसांगवी, कासारगाव, कोळपा, बसवंतपूर, चिंचोलीराव, खाडगाव, धनेगाव येथे भव्य कायदेविशयक शिबीर संपन्न

0
342

लातूर : मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देषानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविशयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

मौजे मांजरी, सामनगाव, खोपेगाव, हरंगुळ (खु), पाखरसांगवी, कासारगाव, कोळपा, बसवंतपूर, चिंचोलीराव, खाडगाव, धनेगाव येथे आज भव्य कायदेविषयक शिबीर पार पडले.

या कार्यक्रमास मांजरी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन गावच्या सरपंच सौ. चव्हाण मंगल विजय या होत्या. प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल अॅड. अजय कलशेट्टी यांनी जेष्ठ नागरिक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन उपस्थित जनतेला केले.

पॅनल अॅड. सुरेष सलगरे यांनी कौटुंबिक हिंसाचार व जादुटोना कायदा याबद्दल माहिती दिली.

तसेच अॅड. ज्योती यावलकर यांनी महिलांचे अधिकार व त्यांचे कायदे याविषयी सविस्तर असे विवेचन गावकऱ्यांना केले. येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे ग्रामसेवक माने प्रमोद यांनी केले व आभार प्रदर्शन उपसरपंच श्रीराम काषीनाथ बचाटे यांनी केले.

कार्यक्रमास गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी व सामनगावचे गावकरी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

खोपेगाव येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन गावच्या सरपंच सौ. तेजाबाई शिवाजीराव मोरे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक शुभदा नरसिंह भगवे या होत्या, यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या विषयावर मार्गदर्शन केले.

विधी स्वयंसेवक, मंजुशा कालेकर यांनी महिलांचे अधिकार व हक्क यावर मार्गदर्शन केले. चैतन्य मोरे -पाटील, लिंबाजी देवकत्ते व साक्षी नवले, विधी स्वयंसेवक यांनी गावकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परमेश्वर महादेव पवार यांनी केले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, महिला, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

कायदेविशयक शिबीर यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.
हरंगुळ (खु) येथे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ झुंजे पाटील हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक मुकूल शैलेष कचरे यांनी कौटुंबिक हिंसाचार याविशयावर मार्गदर्षन केले. तसेच शिवम संतोश भांडे, विधी स्वयंसेवक यांनी लोकन्यायालय यावर मार्गदर्शन केले.

तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इश्वर दत्तकुमार लांब यांनी केले व आभार सुदर्शन राजकुमार हेरकर यांनी केले. यावेळी गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

पाखरसांगवी येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन कोमल ईर्लेवाड, सरपंच हया होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विधी स्वयंसेवक गायत्री अग्रवाल, वैश्णवी खंडेलवाल व राहुल चेबळे हे होते.

गायत्री अग्रवाल यांनी महिलांचे अधिकार याविषयावर मार्गदर्षन केले तसेच वैश्नवी खंडेलवाल यांनी लोकन्यायालय काय असते, त्याचे महत्व जनतेला पटवुन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक चोथवे यांनी केले व प्रास्ताविक आणि आभार आशिष कुटवाडे यांनी केले.

सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, उपसरपंच, ग्रामस्थ व महिला अवर्जुन उपस्थित होत्या.

कासारगाव च्या शिबीरास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अशोक हरिचंद्र सुर्यवंशी तर प्रमुख पाहूणे म्हणुन शुभम शिवाजीराव बिराजदार, तौफिक मन्सुर तांबोळी, सुनिल गायकवाड, प्रियंका देशपांडे, निकीता चव्हाण व इमरान शेख हे विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमात कायद्याचे महत्व पटवुन देताना शुभम बिराजदार यांनी शिक्षणाविशयी शासनाच्या विविध योजना सांगून त्याचे महत्त्व पटवुन दिले व कायदेविशयक शिक्षणाची गरज आहे हे ही सांगीतले.

तौफिक तांबोळी यांनी पर्यायी तंटा निवारण पध्दती ही कशी असते, याचे कामकाज कशाप्रकारे चालते याविषयी माहिती दिली. सोबतच सुनील गायकवाड, प्रियंका देशपांडे, निकीता चव्हाण इमरान शेख यांनी ही विविध विषयावरती कायदेविशयक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकरी येथे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक व सरपंच यांनी विशेष सहकार्य केले.

कोळपा गावात कायद्याचे महत्व जनतेला पटवुन देण्यासाठी या ठिकाणी कायदेविशयक शिबीर घेण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गावच्या सरपंच, रेणुका सोमनाथ खराबे हया होत्या. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणुन विधी स्वयंसेवक डाके अपेक्षा शेषकुमार या होत्या.

यांनी मार्गदर्शन करताना लोकअदालत या विषयावर अतिशय सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये पैसा व वेळेची बचत होते व लवकर निकाल मिळतो याबद्दल सांगीतले.

या कार्यक्रमास येथील ग्रामसेवक, सरपंच व गावातील जेष्ठनागरिक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक कलबुने के.बी. यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपसरपंच हातिमा सय्यद यांनी केले.

बसवंतपूर येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे उपसरपंच दिलीप चिकटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन विधी स्वयंसेवक हावा महेश नागनाथ, आकाश एकनाथराव मदने, प्रतिक शांतविर लांडगे हे होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हावा महेश यांनी विधी सेवा प्राधीकरण अधिनियम याविषयी माहिती दिली. आकाश एकनाथराव मदने यांनी लोकन्यायालय याविषयी माहिती दिली. प्रतिक शांतवीर लांडगे यांनी स्त्रीयांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रामसेवक शंकर भोसले यांनी केले. या कार्यक्रमास येथील ग्रामसेवक, सरपंच व गावातील जेष्ठनागरिक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

चिंचोलीराव येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच दत्ता फुलचंद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन तंटामुक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज पांढरे हे होते. तसेच विधी स्वयंसेवक रोहन टाकळकर, बळीराम कानवटे हे होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रोहन टाकळकर यांनी प्रदुषण मुक्त पाणी आणि हवा यावर मार्गदर्शन केले तसेच बळीराम कानवटे यांनी लोकन्यायालय याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रामसेवक श्री. सय्यद यांनी केले. या कार्यक्रमास येथील ग्रामसेवक, सरपंच व गावातील गावकरी उपस्थित होते.

खाडगाव येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच सौ. हेमा रमाकांत मगर हया होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विधी स्वयंसेवक शेख इम्रान नजीर अ. निसार व शुभम बिराजदार हे होते.

शिक्षणाचे अधिकार यावर शेख इम्रान नजीर यांनी मार्गदर्शन केले तसेच शुभम बिरादार यांनी शैक्षणिक योजना याविषयी माहिती दिली. सोबत प्रियंका देशपांडे, सुनिल गायकवाड, निकीता चव्हाण व तौफिक तांबोळी यांनी वैकल्पिक वाद निवारण पध्दती, महीलांचे अधिकार याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रामसेवक श्री. गोमसाळे यांनी केले.

या कार्यक्रमास येथील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, कर्मचारी व गावातील गावकरी उपस्थित होते.

धनेगाव येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच करे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विधी स्वयंसेवक चंद्रकांत सिताराम साखरे, पल्लवी यादव व कुलकर्णी हे होते.

या कायदेविषयक शिबीरात बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयांवर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. मुलींचे शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी यावेळी पटवुन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले तर आभार पवार यांनी केले.

या कार्यक्रमास येथील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, कर्मचारी व गावातील गावकरी उपस्थित होते.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी व दयानंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आशा कार्यकर्त्या यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.