Gadchiroli Breaking : पोलीस चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार?

0
248

गडचिरोली : आज झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेची पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झाली नाही. त्याचसोबत दंडकारण्य भागाताला आणखी एक मोठा नक्षल नेते जोगन्ना हा देखील चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

आज सकाळी पोलीस आणि नक्षल्यावाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली असून या भीषण चकमकीत पोलिसांना 26 नक्षल्यवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला  हलवण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले  प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री? 

 • 50 ला रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता.
 • मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य.
 • एलगर परिषदेतील फरार आरोपी.
 • एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ.
 • पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी.
 • जंगल आणि अर्बन ह्या क्षेत्रातील दोन्हीवर कामाचा अधिकार.
 • एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.
 • अॅंजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा मावोवादी म्हणून पकडली गेली होती.
 • मिलिंद हा वणी – राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला.
 • शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष.
 • शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हे सुद्धा कामाचा भाग. त्यामुळे ज्या शेकडो हत्या गेलं दशकभर पोलीस व सामान्य नागरिकांच्या मावोवाद्यांच्या हाती झाल्या त्याला जवाबदार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here