नवी दिल्ली : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची दिल्लीच्या डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समितीच्या कार्यकारिणी वर नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती ( रजि.)दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणभूमी (निधन स्थळ) २६ अलीपुर रोड दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी ही समिती १५ वर्षापूर्वी गठीत करून नोंदणीकृत केलेली आहे.
सोबतच दलितांच्या उद्धारासाठी समिती अंतर्गत ‘नॅशनल दलीत महापंचायत’ (एन. डी. एम.) चे ही १५ वर्षापासून स्थापना केलेली आहे.
या दोन्ही संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक कामाची ही पावतीच मिळाली आहे.
डॉ.सुनील बळीराम गायकवाड हे १६ व्या लोकसभेत प्रचंड मतांनी विजयी झाल्यानंतर लोकसभेत शपथ घेताना भारताच्या इतिहासात पहिल्यादाच शपथ घेतल्यानंतर लोकसभेच्या सभागृहात बुलंद आवाजात जयभीमचा जयघोष केलेले पहिले खासदार म्हणून त्यांची नोंद झालेली आहे.
लोकसभे मध्ये दलित हिताच्या संदर्भात अनेक विषय मांडले प्रामुख्यानं भारत देशातील शासकीय वाचनालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी, अनुसूचित जाती जनजातीच्या अट्रोसीटीच्या कायद्यावर लोकसभेत केलेले भाषण, महाराष्ट्र मध्ये घडलेल्या दलित अत्याचारावर शून्य प्रहार मध्ये लोकसभेत विषय मांडलेले अशा लोकप्रतिनिधी च्या कार्याची दखल घेऊन डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समितीवर कार्यकारीणी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या समिती मध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉ. सत्यनारायण जटीया, चरणसिंह आटवाल, केंद्रिय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पी. एल पूनिया, डॉ.उदित राज, टी. एम. कुमार, आत्माराम भाई परमार, राजेश बग्गा, वसंत बोले, डॉ. कंवर सेन, पूर्व केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम, जयांतिभाई परमार, रामचरण गुजराती, मदनलाल सांखला, प्रकाश वर्मा, जोगेश्वर गर्ग, विनीत नागले आदी देशातील आंबेडकरी चळवळीतील मान्यवर या समितीमध्ये आहेत.