लातूर निलंगा मार्गावर नवं तंत्रज्ञान वापरून तयार केला देशातला पहिला नावीन्यपूर्ण पूल : नितीन गडकरी यांनी केली पाहणी

0
857

लातूर : लातूर- निलंगा या रस्त्यावर मसलगा येथे “अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फॉर्सड” (UHPFRC) या नवतंत्राज्ञानाने पर्यावरणपूरक नावीन्यपूर्ण पूल बांधला आहे. त्याची पाहणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

त्यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. विक्रम काळे उपस्थित होते.

पारंपारिक पूल बांधताना 30 मीटर अंतरावर पिलर बांधले जातात या तंत्रज्ञानात 120 मीटर अंतरावर पिलर टाकले आहेत.

एम 40 या पारंपरिक पद्धतीपेक्षा हा 4 पट्ट मजबूत आहे. नेहमीच्या पुला पेक्षा 30 ते 35 टक्के एवढा हा वजनाने हलका आहे.

हा पूल बघितल्या नंतर देशभर आपण असेच पूल बांधणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी या पूल बांधकामातील अभियंते, सहायक अभियंते, कंत्राटदार, प्रत्यक्ष काम करणारे कामगार यांचे गडकरी यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here