मरणानंतरही हाल : निलंग्यात ग्रामपंचायतीसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार

0
357

निलंगा : गेल्या अनेक वर्षापासून अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही, वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर अत्यंस्कार केले.

निलंगा तालूक्यातील हाणमंतवाडी येथील सोजरबाई रामचंद्र निकम (वय ७०) यांचा बुधवारी मृत्यू झाला. हणमंतवाडी हे गाव चार हजार लोकवस्तीचे असून अद्याप गावात स्मशानभूमी नाही.

गेल्या विस वर्षापासून हणमंतवाडी येथील गावकरी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करत आहेत. परंतू जागेचा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याने प्रेताची अवहेलना होत आहे.

त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न कायमच निर्माण होत असतो.

मात्र शासन गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करत नसल्याने गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी गावाच्या भर चौकातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here