खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी प्रवेश चाचण्यांचे 22 व 23 नोव्हेंबर रोजी आयोजन

0
454

लातूर : खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर विविध कौशल्य चाचण्यांच्या आधारे १२ वर्षाखालील १५ मुले व १५ मुलींना प्रवेश देण्यात येणार असून त्यांच्या निवडीसाठी दि. २२ व २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशिय हॉल मधील कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर निवड चाचण्यांचे आयोजन केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध खेळांची प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे.

लातूर जिल्ह्यासाठी कुस्ती या खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

या केंद्रावर १२ वर्षाखालील वयोगटातील मर्यादीत ३० मुले व मुलींसाठी प्रवेश देण्याचे निश्चित केलेले आहे. कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर तज्ञ व जुन्या अनुभवी खेळाडू क्रीडा मार्गदर्शकांमार्फत दैनंदिन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

केंद्रावर प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थींना शासनाच्या वतिने खेळाडू गणवेश, अद्ययावत क्रीडा साहित्य, स्पर्धेतील सहभागाचा खर्च इ. सुविधा देण्यात येणार आहेत.

या चाचण्यांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा तसेच अधिक माहितीसाठी राज्य कुस्ती क्रीडा मार्गदर्शक सुरेंद्र कराड यांचेशी मोबाईल क्रमांक ७९७२३९७१३० वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here