रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील भारतरत्न महामानव डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या मौजे आंबडवे येथे आदरणीय महामहिम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविन्द जी यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रपती महोदयांच्या सौ.सुविद्य पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय महामहिम राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी, मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ना.ॲड. अनिल परब, खासदार श्री.सुनिल तटकरे व राज्यमंत्री संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.