उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अर्धनग्न मुलीची मदतीसाठी पायपीट

0
132

Crime News | मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उज्जैन जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. मारहाणीनंतर पीडिता अर्धनग्न अवस्थेत मदतीसाठी फिरत होती, मात्र पीडितेच्या मदतीला कोणीही आले नाही. पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्य प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडनगर रोडवरील दांडी आश्रमाजवळ सोमवारी सायंकाळी पीडित तरुणी जखमी अवस्थेत आढळून आली. पीडितेचे कपडे फाटलेले होते आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, पीडितेला कुठे जायचे हे कळत नव्हते. पीडित तरुणी सामरखेडी सिंहस्थ बायपासजवळ घरोघरी मदत मागत होती.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडिता मदतीची याचना करताना दिसत आहे, मात्र लोक तिचा पाठलाग करताना दिसत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पीडित मुलगी मदतीसाठी सुमारे 8 किलोमीटर चालत गेल्याचे सांगण्यात येत आहे. आठ किलोमीटर चालल्यानंतर एका आश्रमातील पुजाऱ्याने तिला मदत केली. पीडितेला पाहताच पुजाऱ्याने तिला टॉवेल देऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिला रक्त देण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी पीडितेला काय झाले, अशी विचारणा केली. पण ती काहीच बोलू शकली नाही. उज्जैनचे पोलिस निरीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून पास्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीडितेने कोणतीही माहिती दिली नाही.

आईसोबत काहीतरी वाईट घडल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनीही या घटनेबाबत X (ट्विटर) वर पोस्ट केली आहे. कमलनाथ यांनी दुसर्‍या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, उज्जैनमध्ये एका लहान मुलीवर क्रूर अत्याचाराची घटना पाहणे हृदय पिळवटून टाकणारे आहे. मध्य प्रदेश राज्य मुलींसाठी असुरक्षित झाले आहे. मुलींची सुरक्षा केवळ राज्याच्या प्रसिद्धीसाठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here