नवी दिल्ली : देशात कोविड वॅक्सिनेनशन अभियान वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी प्रवेशासाठी लसीचे सर्टिफिकेट आवश्यक आहे.
तुम्ही जर लसीचे दोन डोस घेतले असतील व तरीही सर्टिफिकेट मिळत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुम्हाला आता थेट WhatsApp च्या माध्यमातून कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट मिळेल.
तुम्ही कोविन आणि आरोग्य सेतू अॅपशिवाय देखील वॅक्सिनेशन सर्टिफिकेट सहज डाउनलोड करू शकता. WhatsApp च्या माध्यमातून सर्टिफिकेट कसे डाउनलोड कराल याविषयी जाणून घेऊया.
WhatsApp च्या माध्यमातून असा डाउनलोड करा कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट
- तुम्ही लस घेताना जो नंबर नोंदवला असेल, त्यावरून ९०१३१५१५१५ या नंबरवर WhatsApp वरून HI लिहून पाठवा.
- हा मोबाइल नंबर काही दिवसांपूर्वीच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केला आहे.
- HI लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की, हे सरकारचे करोना हेल्पडेस्क आहे.
- त्यानंतर तुम्हाला Covid-19 Certificate लिहून पाठवावे लागेल.
- आता तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल, तो तुम्हाला WhatsApp मेसेजद्वारे पाठवायचा आहे.
- आता तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोडचा पर्याय मिळेल.
- यात तुम्हाला १ टाइप करून सेंड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डाउनलोडसाठी पीडीएफ फॉर्मेटमध्ये सर्टिफिकेट मिळेल.
आरोग्य सेतू व कोविन अॅप
WhatsApp व्यतिरिक्त तुम्ही आरोग्य सेतू आणि कोविन अॅपच्या माध्यमातून देखील वॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. या दोन्ही अॅपवर जाऊन तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल.