नवी दिल्ली : सध्याच्या काळात पॅन कार्ड हे नागरिकांसाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरत आहे. त्यात असलेल्या 10 अंकी Alphanumeric कोड च्या माध्यमातून व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवता येते.
आता पॅन कार्डचा वापर (pan card signature change online) ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळं त्यात नागरिकाची योग्य माहिती असणं आवश्यक आहे.
जर त्यात कोणताही दोष असेल तर व्यक्तीला बँक कर्ज देत नाही. त्यासाठी त्यात असलेला फोटो आणि स्वाक्षरी ही योग्य (pan card photo and signature correction) असायला हवी.
जर ती योग्य नसेल तर ते करेक्शन तात्काळ करणं गरेजचं आहे. त्यामुळं आता ते कसं आणि कोणत्या प्रकारे करायला हवं. त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत हे आपण जाणून घेऊ.
काय आहे प्रोसेस?
सर्वात आधी पॅन कार्डची अधिकृत वेबसाईट NSDL ओपन करा. त्यात Application च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Correction च्या ऑप्शनला (pan card application form) सेलेक्ट करा.
त्यानंतर Menu Category मध्ये Personal हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला ज्या माहितीचं करेक्शन करायचं आहे ती माहिती अचुक भरा. त्यानंतर PAN Application वर क्लिक करून KYC च्या ऑप्शनवर क्लिक करा.
स्क्रिनवर Photo Mismatch and Signature Mismatch चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून योग्य फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
त्यानंतर Parents ची योग्य डिटेल्स भरून नेक्स्ट बटनवर क्लिक करा. ही माहिती भरल्यानंतर व्यक्तीला त्याच्या ओळखपत्राचा पुरावा द्यावा लागेल. ते भरल्यानंतर Declaration वर क्लिक करून सबमिट करा.
Fees किती असेल?
भारतात पॅन कार्डच्या दुरूस्तीसाठी 101 रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. आणि भारताबाहेरून जर तुम्ही पॅन कार्डची दुरूस्ती करत असाल तर त्यासाठी 1011 रूपये भरावे लागतील.
त्यानंतर त्याची प्रिंट काढून NSDL च्या ऑफीसला पोस्ट करा. त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला दुरूस्त झालेले पॅन कार्ड पोस्टानं पाठवण्यात येईल.