Coronavirus In Maharashtra: राज्यात आज 1 हजार 130 नवे रुग्ण आढळले, 26 मृत्यू

0
350
Coronavirus In Maharashtra

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाकडून महत्वाची पाऊले उचलण्यात आली. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात येत असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

यातच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येत घट होत असून राज्याचे कोरोना मुक्तच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. लवकरच राज्यातील रुग्णसंख्या पूर्णपणे अटोक्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात आज 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के आहे. राज्यात आज झालेल्या 26 रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के इतके असून आतापर्यंत एकूण 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 लाख 67 हजार 64 होम क्वारंटाईन आहेत.

897 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात काल 1 हजार 338 रुग्ण आढळून आले होते. तर, 1 हजार 584 इतकी होती. याशिवाय, 36 जणांना आपला जीव गमवावा लागला होता

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार करण्यात आला आहे. कोरोनाविरोधात लढ्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. देशात आतापर्यंत 105 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here