उदगीर : ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ मार्गदर्शना अभावी आयटी कंपनीतील नौकरीपसून वंचित राहू नये म्हणून जागतिक आय.टी. कंपनीत नौकरीसाठी आवश्यक असलेले विविध कोर्स आणि तंत्रज्ञानाविषयी मातृभूमी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न झाली. मातृभूमी महाविद्यालय आणि लाॅयन्स क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बीसीए व बीसीएस वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कोडींग कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पांचाळ, योगेश चिद्रेवार, डॉ.संदीप सोनटक्के, डॉ.भाग्यश्री घाळे, माजी प्राचार्य उषा कुलकर्णी, प्राचार्य मनोज गुरुडे उपस्थित होते. या कोडींग कार्यशाळेत अशोक पांचाळ यांनी सी, सीप्लसप्लस, जावा या संगणकाच्या प्रोग्रामिंग लँग्वेज वर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आयटी कंपन्यांची माहिती, विविध कोर्स आणि कंपन्यांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.
विविध आय.टी. कंपनीत नौकरी मिळविण्यासाठी नेमके कोणते कोर्स केले पाहिजेत, आपल्याला आवडेल अशा कोणत्या तंत्रज्ञान क्षेत्रात किती नौकरीच्या संधी आहेत या बाबतची माहिती कशी मिळविली पाहिजे याची सविस्तर माहिती अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्याना दिली.प्राचार्य गूरुडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी शिक्षण चालू असतानाच आपल्या क्षेत्रात नौकारीच्या किती संधी आहेत आणि या साठी विविध आवश्यक कोणते कोर्स केले पाहिजेत याची माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी प्राप्त असूनही केवळ काही कौशल्य प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक तरुण नौकरी आणि उद्योग क्षेत्रात मागे पडत असल्याने अशा कार्यशाळेची गरज असल्याचे सांगितले. या कार्यशाळेसाठी बीसीए बीसीएस प्रथम द्वितीय तृतीय वर्षातील 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा जाई शर्मा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मानले.
Read More