लातूर : ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या 6 सप्टेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार लातूर जिल्हा परिषदेतंर्गत मार्च 2019 व ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्यात येणार आहे.
याकरिता https://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. ही लिंक जिल्हा परिषद लातूरच्या www.zplatur.gov.in यासंकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. तरी उमेवारांनी https://maharddzp.com संकेतस्थळावर परीक्षा शुल्क परत मिळेण्याबाबत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती नियुक्तीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मुलाखती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी विहीत पात्रता धारण इच्छुक उमेदवारांकडून 15 सप्टेंबर, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. या पदाच्या मुलाखती 5 ऑक्टोबर, 2023 रोजी होणार आहेत.
अर्जाच्या छाननी अंती वैध उमेदवार यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या latur.gov.in या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीतील वैध उमेदवार यांनी 5 ऑक्टोबर, 2023 रोजी अनुक्रमांक 01 ते 150 सकाळी 10 वाजता व अनुक्रमांक 151 ते 342 उमेदवार यांनी दुपारी 3 वाजता मुळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, (शाखा-रोहयो) दुसरा मजला हॉल क्रमांक 207 बार्शी रोड, लातूर येथे अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे, असे लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी कळविले आहे.