लातूर : आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा बौद्ध धर्म आहे या धम्माच्या शिकवणीतून व्यक्तीच्या जीवनात सुख, समाधान व मन शांतीचा मार्ग मिळतो हा धम्म मानवतावादी दृष्टीकोनाची जपवणुक करतो असे उदगार राज्याचे पाणी पुरवठा, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
लातूर येथे बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट लातूर आयोजित चौथी अखिल भारतीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पु. विनयरखित महाथेरो पु. भिखु महासेन महाथेरो (लडाख) पु.भिखु डॉ.इंदवस महाथेरो (औरंगाबाद) व समस्त संघ उपस्थित आहेत.
यासोबतच लातूरचे पोलिस अधीक्षक निखीलजी पिंगळे, बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट चे सदस्य श्री. केशव कांबळे, डॉ. विजय अजनीकर, मोहनमाने, चंद्रकांत बिकट, श्री. राजरत्न गायकवाड, डी. एन.नांसिंगे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की बौद्ध धम्म हा जगातील शांती प्रिय आणि अहिंसा तत्वाची शिकवण देते यांच्या शिकवणीतून व्यक्तीच्या जीवनात सुख,समाधान व मन शांती चा मार्ग मिळतो येणाऱ्या काळात लातूर येथील या बौद्ध विहाराला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील .
या विहाराला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मराठवाड्यातील एक संस्कारक्षम व प्रसिद्ध विहार या ठिकाणी उभे करण्यात येईल.
या ठिकाणी जमलेल्या जनतेने व समाजातील सर्व नागरिकांनी पर्यावरणाचे संवर्धन व जतन करावे. प्रत्येकांनी आपल्या परिसरात झाडे लावावी.
त्यामुळे वातावरणात जे प्रतिकूल बदल होत आहेत त्यापासून आपले संरक्षण होइल. झाडे लावा त्यांचे संवर्धन करा; आवाहन यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.