मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना बॉलीवूड आयकॉनिक अवार्ड प्रधान

0
592
Sunil gaikwad

मुंबई : लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबईच्या क्या मेअर हॉल तेथे आज शानदार कार्यक्रमात प्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते बॉलिवूड आयकॉनिक 2022 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

चित्रपट जगातील अनेक मान्यवर कलाकार अभिनेते-अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. गायकवाड हे फिल्म सेन्सार बोर्डवर सदस्य असताना आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समिती भारत सरकार चे सदस्य असताना केलेल्या कामाची कामाची दखल घेऊन आज हा पुरस्कार देण्यात आला.

बॉलिवूड जगातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती हिंदी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार अली खान, प्रसिद्ध अभिनेते अनील नागरा, प्रसिद्ध सिने कलावंत अभिनेते, गीतकार, गायक अरुण बक्षी, गीतकार सुधाकर शर्मा, अंधेरीचे एसीपी बाजीराव महाजन या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण, अभिनेते गजेंद्र चव्हाण केके गोस्वामी प्रसिद्ध कलाकार सुनील पाल ऐसान कुरेशी, गायिका सुनीती पाठक, बुद्धाजली आयुर्वेदिकचे संचालक कैलास मासुंम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here