लातूरमधील आष्टा शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला; मिरची पावडर, दाेरी, राॅड जप्त

0
596

चाकूर (जिल्हा लातूर) : तालुक्यातील आष्टा शिवारात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह साेमवारी दुपारी आढळून आला.

याबाबत चाकूर पोलिसांनी तिघा संशीयीतांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हणमंत व्यंकटी येरवे (४२) असे मयताचे नावे आहे.

पाेलिसांनी सांगितले, हणमंत येरवे (रा. चाकूर) हे दुचाकीवरुन रविवारी घराबाहेर पडले. दरम्यान, त्यांचा रात्री दहापासून माेबाईल बंद असल्याचे दिसून आले, असे त्यांचे बंधू अमाेल येरवे यांनी सांगितले.

हणमंत येरवे यांची दुचाकी लातूर राेड नजीकच्या एका धाब्याशेजारी पडलेली साेमवारी आढळून आली.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आष्टा शिवारात आढळून आल्याची माहिती मिळाली.

चाकूर येथील सहायक पाेलीस अधीक्षक अनिकेतन कदम, पाेलीस निरीक्षक बालाजी माेहिते, दामाेदर सिरसाट, हणमंत आरदवाड, भागवत मामडगे, सुकेश केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

अनाेळखी मृतदेहाची ओळख पटली, ताे हणमंत येरवे यांचा असल्याचे समाेर आले. मृतदेहा शेजारी मिरची पावडर, राॅड, दाेरी आढळून आली आहे.

याबाबत पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकूर पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here